बलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खानशी पंगा घेऊन फोटोग्राफर्सना पश्चाताप झाल्याचे जाणवत आहे. रविवारी (20 जुलै) मुंबईमध्ये झालेल्या एका चॅरिटी फुटबॉल सामन्यादरम्यान फोटोग्राफर्सनी सलमान खानसह पॅचअप करून देण्याची अभिनेता आमिर खानला विनंती केली.
आमिर खानची मुलगी इराच्या वतीने आयोजित या फुटबॉल सामन्यानंतर फोटोग्राफर्सनी आमिरशी या वादाबद्दल बातचीत केली. सलमान खानसोबत पॅचअप करून देण्यास सांगितले. कारण सलमान आणि आमिर चांगले मित्र आहेत. आमिरनेसुध्दा फोटोग्राफर्सना शब्द दिला आहे, की तो याविषयी सलमानशी बोलेल.
काल (20 जुलै) फोटोग्राफर्सनी फोटो काढण्यास नकार दिल्यानंतरसुध्दा सलमानला काहीच फरक पडला नाही. त्यानंतर फोटोग्राफर्सना त्यांच्या चुकिची जाणीव झाली. याकडे पाहून असे जाणवते, की सलमानचा बायकॉट करून त्यांनाच सर्वात मोठे नुकसान झेलावे लागत आहे. सलमान माध्यमांपासून दूर राहून समाधानी आयुष्य जगत आहे.
सलमान आणि फोटोग्राफर्स यांच्यातील वाद मिटवण्यात आमिर खानची काय भूमिका असणार हे बघणे रंजक ठरणार आहे.
पुढे वाचा... काय आहे सलमान आणि फोटोग्राफर्स यांच्यातील प्रकरण?