आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan To Work Again With Murugadoss After Ghajini

'गजनी'नंतर पुन्हा एकदा मुरुगादाससह काम करणार आमिर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: ए. आर. मुरुगादाससह आमिर खान
मुंबई: आमिर खानने ए आर मुरुगादास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या 'कत्थी' या तामिळ सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करण्याचे संकेत दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये या तामिळ सिनेमाचे पहिले प्रिंट पाहिल्यानंतर तो यावर निर्णय सांगणार आहे.
डिसेंबरमध्ये रिलीज होणाररा 'पीके' साइन केलेल्या नंतर आमिर खानने कोणताच सिनेमा साइन केलेला नाही. ए आर मुरुगादास दिग्दर्शित 'हॉलिडे'च्या यशानंतर अक्षयने पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हृतिक रोशन आणि अजय देवगणनेसुध्दा मुरुगादास यांना त्यांचे सिनेमे दिग्दर्शिक करण्याचा प्रस्तव पाठवला होता. परंतु आमिरने मध्येच उडी घेऊन सर्वांना मागे टाकले आहे. मुरुगादास सध्या दक्षिणचा सुपरस्टार विजयसह तामिळ सिनेमा 'कत्थी' बनवत आहेत.
हीरोच्या दुहेरी भूमिकेचा थ्रिलर आणि अ‍ॅक्शन असलेला हा सिनेमा यावर्षी रिलीज होत आहे. नील नितीन मुकेशसुध्दा या सिनेमातून दक्षिण सिनेमात पाऊल ठेवत आहे. या सिनेमात त्याची नकारात्मक भूमिका असणार आहे. मुरुगादास यांच्यासह झालेल्या बातचीतमध्ये आमिरने या कहानीला पसंती दिली होती.
या संबंधित एका सूत्राने सांगितले, की दोघांमध्ये असे ठरले, की सिनेमाची एडिटींग झाल्यानंतर आमिर पहिले प्रिंट पाहणार आहे. त्यानंतर सिनेमाशी जोडण्याचा निर्णय घेणार आहे. या जोडीने 2008मध्ये सुपरहिट 'गजनी' बनवला होता. दोघांमध्ये एकच साम्य आहे, की दोघे एका वेळी एकच सिनेमासाठी काम करतात.
मुरुगादास एक सिनेमाचे शुटिंग नवीन दिग्दर्शकांप्रमाणे 50-60 दिवसांमध्ये संपवत नाही. त्यांना जवळपास 90-100 दिवसांचा कालावधी लागतो. पोस्ट प्रॉडक्शनसुध्दा घाईत नसते. गरज पडलीच तर रिशूटसुध्दा केले जाते. 'कत्थी' आमिरला पसंत पडला तर तो त्याच्या होम प्रॉडक्शनमध्ये हा सिनेमा बनवणार आहे.
आमिरने नुकताच करण जोहरचा 'शुध्दी' आणि फरहान अख्तरच्या बॅनरखाली तयार होणारा सिनेमा करण्यास नकार दिला आहे. मुरुगादास यांनीसुध्दा दिग्गज अभिनेत्यांकडून मिळणा-या संदेशाव्यतिरिक्त आमिरसाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये हिंदी 'कत्थी'वर निर्णय घेण्यात येणार आहे. आमिरने हा सिनेमा करण्यास नकार दिला तर मुरुगादास इतर बॉलिवूड अभिनेत्यांशी बातचीत करतील.