(जयपूरमध्ये भास्करशी बातचीत करताना आमिर खान)
जयपूर- अभिनेता आमिर खानला जगातील विविध लोकांना भेटून त्यांच्या मनातील भावना आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळेच, त्याने जयपूरची निवड केली. त्याला गावागावात जाऊन प्रत्येकाचे दु:ख समजून घ्यायचे आहे. आमिर म्हणाला, 'ऑल इंडिया रेडिओवर लोक माझ्याशी बोलतात तेव्हा मला खूप आनंद होतो.' आमिर खान रविवारी सत्यमेव जयतेच्या मुमकिन है कार्यक्रादरम्यान थेट प्रसारणासाठी जयपूरमध्ये होता. यावेळी आमिर खानने भास्करसोबत बातचीत केली. यादरम्यान तिने शोच्या संकल्पनेवर बातचीत केली. सोबतच, तिने शोविषयीचे अनुभव शेअर केले.
भास्करशी आमिरची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत
भास्कर- तू सत्यमेव जयतेसाठी विषयांची निवड कशी करतो?
आमिर- कोणत्याही विषयासाठी खूप संशोधन करावे लागते. आम्ही जर 12 मुद्दे मांडत आहोत, तर कमीत-कमी 20 विषयांचे संशोधन करावे लागले तेव्हा सर्व निश्चित होते.
भास्कर- 'मुमकिन है'ची कल्पना कशी सुचली?
आमिर- सत्यमेव जयतेच्या मागील दोन पर्वात आम्ही ऑल इंडिया रेडिओ आणि एफएमच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत होतो. लोकांचे रेकॉर्डिंग ऐकून मी त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दोन दिवसांनंतर देत होतो. यावरूनच मला 'मुमकिन है'ची कल्पना सुचली. मग मी विचार केला, की ही कल्पना
आपण या पर्वात सत्यमेव जयतेसाठी आमलात आणावी.
भास्कर- अनेकदा आम्ही तुला एपिसोडमध्ये रडताना पाहिले आहे, तू खरंच इतका भावूक आहेस का?
आमिर- तुम्ही पडद्यावर मला जेवढे रडताना पाहिले आहे, त्यापेक्षा जास्त इमोशनल आहे. अनेकदा शूटिंगदरम्यान खूप वेळ रडायचो आणि शूटिंग थांबवावे लागत होते. कधी-कधी तर मी दु:खात बुडून जात होतो. अशा परिस्थितीतून बाहेर पडायला मला वेळ लागायचा.
मी एखाद्या पत्रकारापेक्षा कमी नाही
आमच्या कामात मोठे संशोधन असते. पत्रकाराप्रमाणेचे आम्ही काम करतो. सत्यमेव जयतेच्या शूटिंगवेळी मी आणि माझ्या टीमने खूप संशोधन केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरचा सविस्तर मुलाखत...