आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'PK'मध्ये आमिरचे दिसणार 8 पॅक अ‍ॅब्स, शूटिंगच्या Picsमध्ये झाला खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पीके'च्या शूटिंगदरम्यान आमिर खान)
मुंबई: आमिर खानचा आगामी 'पीके' सिनेमा येत्या 19 सप्टेंबरला रिलीज होत आहे. सिनेमाचे प्रमोशन आमिरने पोस्टरने सुरु केले आहे. त्याने सिनेमा संबंधित चार पोस्टर रिलीज केले आहेत. या पोस्टरमध्ये आमिरचा लूक लोकांनी पसंत केला आहे. यावेळी आमिरचा नवीन लूक छायाचित्रांतून समोर आला आहे. सिनेमात त्याचा हा लूक दिसत आहे.
आमिर अलीकडेच सिनेमाच्या शूटिंगसाठी नाशिकच्या एका मंदिरात पोहोचला होता. तिथे त्याने गोदावरी नदीमध्ये स्नान केले. त्यावेळी आमिरची बॉडी सिनेमात कशी असणार याचाही खुलासा झाला. या छायाचित्रातून स्पष्ट होते, की सिनेमात आमिरचे 8 पॅक अ‍ॅब्स दिसणार आहे असे कळते आहे. यापूर्वीसुध्दा आमिरने बॉडीसाठी सिनेमाची पटकथा बदलली होती. आमिर मुंबईमध्येसुध्दा नियमीतरित्या जिममध्ये जात होता. त्यावेळी तो जिममध्ये किती मेहनत करत होता, हे या छायाचित्रांतून दिसले आहे.
'हॅप्पी न्यू इअर'मध्ये शाहरुख खानसुध्दा 8 पॅक अ‍ॅब्समध्ये दिसणार आहे. त्याच्या बॉडिची आमिरने खूप प्रशंसा केली. आता आमिरनेसुध्दा 8 पॅक अ‍ॅब्स बनवले आहे. अर्थातच खान यांच्यात सिनेमांमध्ये 8 पॅक अ‍ॅब्स दाखवण्याची स्पर्धा लागलेली दिसून येते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरच्या 8 पॅक अ‍ॅब्सची छायाचित्रे...