सातारा- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट
आमिर खानचा भाऊ मन्सूर अली खान यांची पाचगणीमधील भिलार येथील जमीन काही भामट्यांनी बनावट कागरपत्राच्या आधारे विकली आहे.
मन्सूर खान यांच्यासह संजय दत्तचे वकील वाधवा यांची मुलगी शोभा राजपाल यांनाही याप्रकरणाचा फटका बसला आहे. बनावट कागदपत्रे बनवून राजपाल आणि मन्सूर खान यांच्या मालकीची 55 गुंठे जमीन हडप करण्यात आली. या प्रकरणी एका वकिलासह 9 जणांविरोधात पोसिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आमिर खानचे भाऊ आणि संजय दत्तचे वकिल वाधवा यांची मुलगी शोभा राजपाल यांनी पाचगणी येथील भिलार गावात 55 गुंठे जमीन विकत घेतली होती. त्या जमीनीकडे त्यांचे जास्त येणे-जाणे नव्हते. याचा फायदा घेत काही भामट्यांनी या जमिनीची खोटी कागदपत्रे बनवून ही जमीन याच भागातील दिलीप गोळे आणि लक्ष्मण गोळे यांना 50 लाखांत विकली.
या जमिनीची व्यवहार महाबळेश्वर येथील दुय्यम निबंधनक कार्यालयात पूर्ण झाला. जमिनीसंबंधीची माहिती शोभा राजपाल यांना जाहिरातव्दारे कळाले. त्यांनी ही माहिती त्वरीत पोलिसांना कळवली आणि त्या 9 भामट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.