आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पीके'चे दुसरे पोस्टर रिलीज, ट्रान्झिस्टरऐवजी आमिरने हातात पकडला बँड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पीके'चे दूसरे पोस्टर)
मुंबई - आमिर खानने आपल्या आगामी पीके या बहुचर्चित सिनेमाचे दुसरे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये आमिरने म्हटल्याप्रमाणे खरोखरच ट्रान्झिस्टर गायब आहे. खरं तर दुस-या पोस्टरमध्ये आमिर राजस्थानी वेशभूषेत हातात बँड पकडून उभा दिसतोय. आमिरचे हे पोस्टर खूप फनी आहे.
‘आपल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरही नसेल’ असे आमिरने गेल्या आठवड्यात मीडियाशी बोलताना म्हटले होते. हे पोस्टर बघता आमिरचे म्हणणे अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. आमिरच्या या पोस्टरमध्ये कुठेही ट्रान्झिस्टर दिसत नाहीये. पण, आमिरच्या या पोस्टरला कुणीही अश्लील मात्र म्हणणार नाही, हेही नक्की. पीकेच्या पहिल्या पोस्टवरुन बराच वाद निर्माण झाला होता. या पोस्टरमध्ये आमिर विवस्त्र दिसत होता. त्याच्या हातात केवळ एक ट्रान्झिस्टर होते.
आमिरने हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट करुन ट्विट केले, ''ई देखा हमार दूसरा पोस्टरवा...ई मा ट्रांजिस्टर भी नहीं है...का समझे..।'' याशिवाय आमिरने एक मोशन पोस्टर पोस्ट करुन भोजपुरी भाषेत लिहिले, ''एइसे टुकर-टुकर का घूर रहे हो...हैं...कपड़ा पहिन लिए तो क्या पहचाने नहीं हमका। अरे हम ऊही हूं पीके... ट्रींजिस्टर वाला..''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आमिर खानचे ट्विट आणि मोशन पोस्टर...