आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan's PK All Set To Release On 19 December 2014

आमिरचा बहुप्रतिक्षित 'पीके' 19 डिसेंबर रोजी होणार रिलीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता आमिर खानचा बहुप्रतिक्षित 'पीके' हा सिनेमा आता जून किंवा जुलै ऐवजी डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. ख्रिसमसच्या आठवड्याभरापूर्वी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी आणि डिस्ने इंडियाने सांगितले, की 'पीके' आता 19 डिसेंबर रोजी रिलीज होईल. आमिरचे सर्व सिनेमे ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होतात आणि बॉक्स ऑफिसवर त्याचे सिनेमे चांगले प्रदर्शन करतात.
ख्रिसमसच्या आठवड्याभरापूर्वी सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला असल्याचे दिसून येते. सिनेमा ख्रिसमसच्या आठवड्याभरापूर्वी रिलीज करण्यात येईल, जेणेकरुन 25 डिसेंबरपासून सुरु होणा-या सुट्या आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशचा फायदा सिनेमाला होईल आणि त्याला हाऊसफूल प्रतिसाद मिळेल.