आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Superstar Aamir Khan\'s \'PK\' Cross 100 Crore At The Box Office

\'PK\' ठरला 100 कोटींची कमाई करणारा 35वा सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई आमिर खानचा 'पीके' हा सिनेमा पहिल्या विकेण्डला (शुक्रवार, शनिवार आणि रविवार) शंभर कोटींची कमाई करु शकला नाही. मात्र सोमवारी 22.40 कोटींची कमाई करुन या सिनेमाचा भारतातील एकुण व्यवसाय 117.61 कोटींपर्यंत पोहोचला आहे. सिनेमाला माऊथ पब्लिसिटीचा चांगला फायदा मिळतोय. सोबतच समीक्षकांनीही सिनेमाचे कौतुक केले आहे.
100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता 'पीके'चा पुढचा टप्पा 200 कोटींची कमाई करणे हा आहे. 200 कोटीच्या क्लबमध्ये यावर्षी केवळ दोनच सिनेमे सामील होऊ शकले. यामध्ये सलमानच्या 'किक' (233 कोटी) आणि शाहरुखच्या 'हॅपी न्यू ईयर' (203 कोटी) या सिनेमांचा समावेश आहे. समीक्षकांच्या मते आमिरचा 'पीके' हा सिनेमासुद्धा लवकरच दोनशे कोटींचा आकडा पार करेल.
भारतात 100 कोटींची कमाई करणारा 'पीके' हा 35वा सिनेमा ठरला आहे. या 35 सिनेमांमध्ये आमिरच्या चार सिनेमांचा समावेश आहे.
आमिरच्या या चार सिनेमांनी शंभर कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केला आहे...
सिनेमे कमाई (भारतात)
धूम 3 280.24 कोटी
3 इडियट्स 202.00 कोटी
पीके 117.61 कोटी
गजनी 114.00 कोटी
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, 'पीके'ने या वर्षी कोणकोणत्या सिनेमांना पछाडले आणि कोणत्या सिनेमांचे त्याच्यापुढे आव्हान आहे...