सरत्या वर्षात सुपरस्टार
आमिर खानचा '
पीके' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षक आणि हिंदी सिनेसृष्टी आतुरतेने वाट बघत होते. राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि आमिर खान स्टारर 'पीके'च्या प्रिंट आणि प्रचाराचा जगभरातील एकुण खर्च 90 कोटींच्या घरात आहे.
मल्टीस्टारर या सिनेमाचा निर्मिती खर्च इतर मोठ्या हिंदी सिनेमांच्या तुलनेत खूप कमी आहे. याचे कारण म्हणजे निर्माता विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी आणि आमिर खान या तीन दिग्गजांनी
आपल्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा फार कमी मानधनात या सिनेमाची निर्मिती केली आहे.
या सिनेमाच्या नफ्यात तिघेही वाटेकरी आहेत. शिवाय डिस्ने स्टुडिओने अतिशय कमी कमिशनवर संपूर्ण जगभरात हा सिनेमा रिलीज करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या त्रिकुटाने यापूर्वी 'थ्री इडियट्स'वर याच फॉर्म्युलाने काम करुन भरपूर सन्मान आणि पैसे कमावले आहेत.
'पीके' हा सिनेमा सुपरहिट होईल यात शंका नाही, मात्र हा सिनेमा
बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे. ख-या अर्थाने या टीमची स्पर्धा स्वतःशीच आहे.
भारतात गेल्या सात दशकांमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे आले आहेत. मात्र बॉक्स ऑफिस आणि समजावर सर्वात जास्त दबदबा राहिला तो 'शोले', '
हम आपके हैं कौन' आणि 'थ्री इडियट्स'चा. 'शोल'ची टीम पुन्हा 'शोले' नाही बनवू शकली. 'हम आपके हैं कौन'नंतर सूरज बडजात्या तिच जादू रिक्रिएट करु शकले नाहीत.
अर्थातच चहापत्ती, साखर आणि पाण्यापासून तयार होणा-या चहाची चव दररोज सारखी राहू शकत नाही. विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी आणि आमिर खान या तिघांनी 'थ्री इडियट्स'मध्ये म्हटले होते, ‘काबिलियत का पीछा करो तो कामयाबी अपने आप आ जाती है’. ही प्रतिभावंत टीम याचा मार्गाचा अवलंब करुन 'पीके'सोबत नवीन इतिहास नक्की रचेल, अशी आसा प्रेक्षक आणि उद्योगजगताला आहे.