(अभिनेता आमिर खानचा मुलगा आझाद अभिषेक बच्चनसह खेळताना)
मुंबई - आमिरचे मिस्टर परफेक्शनिस्टचे गुण त्याचा लाडका लेक आझादमध्येही दिसू लागले आहेत. अलीकडेच मुंबईत चॅरिटीसाठी एका फुटबॉल मॅचचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमिरचा हा चिमुकला मैदानात फुटबॉल मॅच खेळताना दिसला. चॅरिटी मॅच संपल्यानंतर अभिषेक आझादसह मॅच खेळला.
चॅरिटी मॅचमध्ये आमिरच्या टीमने अभिषेकच्या टीमचा पराभव केला. ही मॅच संपल्यानंतर अभिषेक मस्तीच्या मूडमध्ये आझादसह खेळला. आझादला खेळताना पाहून त्याची आई किरण राव खूप आनंदी दिसली. आझादने व्हाइट टी-शर्ट आणि डेनिम पॅण्ट आणि स्पोर्ट्स शू घातले होते. आमिरनेसुद्धा आजादसह भरपूर एन्जॉय केले. या चॅरिटी मॅचचे आयोजन आमिरची मुलगी इराने केले होते.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा अभिषेकसह फुटबॉल खेळणा-या आझादची खास छायाचित्रे...