आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'PK'चे तिसरे पोस्टर रिलीज, पोलिसाच्या गेटअपमध्ये आमिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आमिर खान स्टारर 'पीके' सिनेमाचे पोस्टर)
मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या आगामी 'पीके' या सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. हे या सिनेमाचे तिसरे पोस्टर आहे. या पोस्टरसोबत आमिरने ट्विटरवर भोजपुरी भाषेत मजेशीर ट्विट्स केले आहेत.
या नवीन पोस्टरवर आमिर पोलिसाच्या गणवेशात दिसत आहे. त्याच्या गणवेशावर दोन स्टार असून त्याने टोपीसुद्धा घातली आहे. याशिवाय त्याच्याकडे एक ट्रान्झिस्टरसुद्धा आहे. आमिर पोस्टरवर सावधान मुद्रेत दिसतोय. हे एक मोशन पोस्टर असून यामध्ये सुरुवातीला संजय दत्त दिसतो. संजय बँडवाल्याच्या गेटअप झळकतोय.
मोशन पोस्टरमध्ये आमिरचा आवाज ऐकू येतो. आमिर म्हणतोय, "फिर टूकुर-टूकुर देखत हो। कनफ्यूजिया गए। अरे, इ हम नई हूं। इ हमरा फेरेंड है भैरो सिंह। तनकी वेट करो, हम आ रहा हूं।" आमिरने पोस्टरसोबत आपल्या ट्विटरवर ट्विट केले आहे.
आमिरचे ट्विट...
Ei Layo, ab dekha PK ka humra naya posterwa!!!.
Lull Sala!!! Galti ho gawa. Mishtake se hum apna teebhi ka porograam ka ad-wa daal diya.
Ei dekha... PK ka humra naya adbhurteesmant... dekha aur bola... kaisan laaga?
'पीके'च्या पहिल्या पोस्टरमध्ये आमिर न्यूड अवस्थेत दिसला होता. त्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. तर दुस-या पोस्टरमध्ये तो बँडवाला लूकमध्ये दिसला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आत्तापर्यंत रिलीज झालेले 'पीके'चे पोस्टर. याशिवाय शेवटच्या
स्लाईडमध्ये पाहा 'पीके'च्या मोशन पोस्टरचा व्हिडिओ...