मुंबईः '
पीके' हा सिनेमा आज
बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. मात्र रिलीजपूर्वी बिझनेस, क्रिकेट आणि बॉलिवूडच्या मान्यवरांना आमिरने
आपला सिनेमा दाखवला. अलीकडेच मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पीके बघितला. आमिरने अंबानी कुटुंबासाठी खास त्यांच्या घरीच म्हणजे अँटिलामध्ये पीकेचे स्क्रिनिंग आयोजित केले होते.
या स्क्रिनिंगवेळी आमिरची पत्नी किरण राव त्याच्यासोबत हजर होती. शिवाय सिनेमात मेन लीडमध्ये झळकलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचीही हजेरी यावेळी होती.
यापूर्वी आमिरने सचिन तेंडुलकरसाठी पीकेचे खास स्क्रिनिंग ठेवले होते. यामध्ये सचिन पत्नी अंजलीसोबत सहभागी झाला होता. सचिनने आमिरच्या सिनेमाचे कौतुक करत हा सिनेमा आमिरचा बेस्ट सिनेमा असल्याचे म्हटले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अँटिलामध्ये पोहोचत असताना क्लिक झालेली सेलेब्सची ही छायाचित्रे...