आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Aaradhya Bachchan's Cousin Brothers And Sister

PIX: भेटा आराध्या बच्चनच्या मामे आणि आते बहीणभावंडांना, जाणून घ्या त्यांच्याविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऐश्वर्या आणि आराध्या, ऐश्वर्याची वहिनी शर्मिला आणि तिचा मुलगा विहान, ऐश्वर्याची नणंद श्वेता नंदा आणि तिची मुले नव्या आणि अगस्त्या)
अभिषेक-ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चनला हिला सख्खे बहिण-भाऊ नाहीयेत. मात्र तिला मामे आणि आते बहीण-भावंड आहेत. आराध्याला दोन मोठे भाऊ आहेत. अगस्त्या नंदा आणि विहान राय ही आराध्याच्या भावांची नावे आहेत. याशिवाय आराध्याला एक मोठी बहीण असून तिचे नाव नव्या नवेली नंदा आहे.
अगस्त्या आणि नव्या ही आराध्याची आत्या श्वेता नंदाची मुले आहेत. तर विहान हा आराध्याचा मामा अर्थातच ऐश्वर्याचा थोरला भाऊ आदित्य राय यांचा मुलगा आहे. विहान आराध्यापेक्षा एका वर्षाने मोठा आहे. तो आता शाळेत जाऊ लागला आहे.
आराध्याची आतेबहीण नव्या नवेली लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असून सोशल नेटवर्किंग साइट्सवर सक्रिय आहे. आपली ग्लॅमरस लूकची छायाचित्रे नव्या ट्विटरवर शेअर करत असते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन नव्याचा चांगला मित्र आहे. नव्या अगस्त्यापेक्षा वयाने चार वर्षे मोठी आहे. नव्या आणि अगस्त्याचे वडील निखिल नंदा, राज कपूर यांची मुलगी ऋतू नंदा यांचा मुलगा आहे. अर्थातच करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोघांच्या आत्या आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा आराध्याच्या बहीण-भावंडांची ही खास छायाचित्रे...