'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेते
अमिताभ बच्चन अलीकडेच दुबईला गेले होते. तेथे त्यांना एक खास गिफ्ट मिळाले. हे गिफ्ट त्यांची नात आराध्या बच्चनसाठी होते. आराध्याच्या एका छोट्या चाहतीने हे गिफ्ट खास तिच्यासाठी बिग बींना दिले होते. हे गिफ्ट त्या चिमुकलीने स्वतः पॅक केले होते.
अमिताभ यांनी या गिफ्टविषयी आपल्या ब्लॉगवर माहिती दिली. बिग बींनी ब्लॉगवर सांगितले, ''ती चिमुकली गर्दीतून वाट काढत माझ्याकडे गिफ्ट द्यायला आली. हे गिफ्ट तिने स्वतः पॅक केले होते. त्या मुलीने ते गिफ्ट केवळ मला काढूनच दाखवले नाही, तर गिफ्टविषयी माहितीसुद्धा दिली. मग पुन्हा ते गिफ्ट स्वतःच्या हाताने पॅक केले आणि सांगितले की हे गिफ्ट मी आराध्याला द्यावे.''
बिग बी पुढे म्हणाले, ''मला मुलांसोबत वेळ घालवणे पसंत आहे. लहान मुले खूप साधी असतात.'' अमिताभ यांनी त्या लहानग्या मुलीसोबतची छायाचित्रे आपल्या ब्लॉगवर पोस्ट केली आहेत.
एकंदरीतच बच्चन कुटुंबातील सर्वात लहान सदस्य आराध्याची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आहे, हे यावरुन दिसून येतं.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आराध्यासाठी गिफ्ट देणा-या चिमुकल्या मुलीसोबतची बिग बींची छायाचित्रे....