आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman\'s Younger Sister Arpita Khan Wedding With Boyfriend Aayush Sharma

सलमानच्या बहिणीसोबत लग्न करुन हा होईल खान कुटुंबाचा जावई, पाहा अर्पितासोबतचे PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमानची बहीण अर्पिता बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत)
मुंबईः सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान येत्या 18 नोव्हेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या तयारी संपूर्ण खान कुटुंब सध्या बिझी आहे. अर्पिताच्या लग्नात खास पाहुणे सहभागी होणार आहेत. शाहरुख खान या लग्नात सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.
अर्पिताचे लग्न तिचा बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अर्पिता आणि आयुष रिलेशनशिपमध्ये असून प्रेमाच्या नात्याचे रुपांतर हे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात करत आहेत. आयुष मुळचा दिल्लीचा असून बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. या दोघांची भेट एका पार्टीत झाली होती. भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जेव्हा या दोघांच्या नात्याविषयी सलमानला कळले, तेव्हा त्याने आपल्या फार्म हाऊसवर आयुषच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि कुटुंबाच्या सहमतीने लग्न निश्चित केले. अर्थातच आता आयुष सलमानचा भावोजी होणार आहे.
अर्पिता आयुष अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरताना कॅमे-यात कैद झाले आहेत. या दोघांची खास छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पुढील स्लाईड्मध्ये पाहा आयुष-अर्पिताची खास झलक...