आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ABCD Actress Lauren Gottlieb Signed Up For Sequel Project ABCD 2

वरुण-श्रध्दासह 'ABCD 2'मध्ये झळकणार लॉरेन गॉटलिएब, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: लॉरेन गॉटलिएब
मुंबई: रेमो डिसूजाच्या डान्स बेस्ड 'ABCD: एनी बडी कॅन डान्स' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या अभिनेत्री आणि डान्सर लॉरेन गॉटलिएबला 'ABCD 2'मध्ये एक महत्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. या सिनेमात वरुण धवन आणि श्रध्दा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. रेमो डिसूजा 'ABCD' हा डान्सवर आधारित सिनेमा आहे. डान्सवर बनलेला हा भारतात पहिला सिनेमा आहे.
वरुण धवन, श्रध्दा कपूर आणि लॉरेनव्यतिरिक्त प्रभूदेवासुध्दा एकदा पुन्हा आपल्या जून्या भूमिकेत अर्थातच नृत्यप्रशिक्षक विष्णूची भूमिका साकारणार आहे. लॉरेनने या बातमीचे स्पष्टीकरण देताना सांगितले, 'मी 'ABCDच्या सीक्वलचा सहभाग झाल्याने खूप आनंदी आहे. मी ABCDमध्ये रेमो सरांसोबत खूप काम केले होते. मला अपेक्षा आहे, की 'ABCD'चा सीक्वलसुध्दा पहिल्या पार्टप्रमाणे हिट होईल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लॉरेन गॉटलिएबची 11 निवडक छायाचित्रे...