आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभय देओलच्या बुडत्या नावेला तारणार सेतू श्रीरामचा 'स्नफू'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदर्शित झालेल्या 'वन बाय टू'सारख्या फ्लॉप चित्रपटाची निर्मिती करणारा अभय देओल करिअरच्या सर्वात निराशाजनक वळणावर उभा आहे. यादरम्यान त्याच्यासाठी नवीन चित्रपट 'स्नफू' आशेचा किरण बनून आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सेतू श्रीराम करणार आहेत. यापूर्वी श्रीराम यांनी सलमान खानच्या 'वाँटेड', 'तेरे नाम' आणि अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड!'सारख्या चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केलेली आहे.
त्यांच्या या चित्रपटात अभय देओलची मुख्य भूमिका राहील. चित्रपटात ते कॉर्पोरेट कन्सल्टंट बनणार आहे. रोमँटिक गाणे आणि स्टंट्सशिवाय अभय यामध्ये मोठमोठे व्यापारी सौदेबाजी आणि मध्यस्थाचे माइंड गेम खेळताना दिसणार आहे. चित्रपटात खूप ग्रे शेड्स असल्याने अभयला अनेक वेळा स्क्रिप्ट काळजीपूर्वक वाचावी लागली. एकदा वाचल्यानंतर त्याला यामध्ये अनेक शक्यता वाटल्या.