आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटी हासुद्धा 'देओलच'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काका धर्मेंद्र आणि भाऊ सनी आणि बॉबी देओलप्रमाणे देओल कुटुंबाच्या या लाडक्या मुलाकडूनही धमाकेदार अँक्शनची अपेक्षा होती. धर्मेंद्रने पाच किलोचा हात आणि सनीने अडीच किलोचा हात पडद्यावर आणला होता त्यानंतर अभयसुद्ध पडद्यावर दीड किलोचा हात आणतोय की काय असे वाटत होते, पण तसे काही झाले नाही. अभय देओलने ऑफबीट चित्रपट निवडले आणि तो तेच चित्रपट करत गेला.
पण आता त्याच्या आगामी चित्रपटात 'देओल' प्रभाव दिसणार आहे. प्रकाश झा यांच्या 'चक्रव्यूह'मध्ये अभय भरपूर मारधाड करताना दिसणार आहे. अभयने पहिल्यांदाच अँक्शन केले. पण अँक्शन पाहून यात तो तरबेज असल्याचे सेटवरील लोक म्हणत आहेत.
चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अभय बंदूक घेऊन पूर्ण गँगसोबत दिसत आहे. हा चित्रपट नक्षलवाद्यांवर आधारित आहे आणि अभयने देखील एका नक्षलीची भूमिका साकारली आहे. अर्जुन रामपाल या चित्रपटात एका पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत आहे. हा एक अँक्शन चित्रपट आहे. प्रॉडक्शन टीमच्या एका सदस्यानुसार, या चित्रपटात रिअल अँक्शन आहे. काही चित्रपटात एकटाच हीरो 30-40 लोकांशी लढाई करतो आणि त्याला काहीच होत नाही, शिवाय डझनभर बंदुकीच्या गोळ्यातून तो सुरक्षित निघतो आणि हीरोइनलाही घेऊन जातो. असा काहीसा प्रकार यात दिसणार आहे. अभयने संपूर्ण चित्रपटात स्टंट हीरोची मदत घेतलेली नाही.
अभय देओलचा गर्लफ्रेंड प्रीती देसाईसोबत चित्रपट
हात धुवून घतोय अभय देओल