आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhijat Joshi Exclusive Interview On Aamir Khan Upcoming Movie \'PK\'

लेखकाच्या तोंडूनः नागपूर-अहमदाबादशिवाय \'PK\'ची कथा लिहिलीच गेली नसती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाचे सहलेखक अभिजात जोशी आणि सोबत खुर्चीत बसलेले सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी)
मुंबईः 19 डिसेंबर 'पीके' हा सिनेमा रिलीज होतोय. आमिर खान आणि अनुष्का शर्मा स्टारर 'पीके'ची कहाणी गुजराती लेखक अभिजात जोशी यांनी लिहिली आहे. अभिजात यांनी divyabhaskar.comसोबत एक्सक्लूझिव्ह बातचित केली. त्यांनी 'पीके'मध्ये अहमदाबाद आणि नागपूरचा प्रभाव असल्याचे सांगितले. अहमदाबाद आणि नागपूरशिवाय 'पीके'ची कथा लिहिलीच गेली नसती, असेही अभिजात यांनी सांगितले.
कोण आहेत अभिजात?
12 जानेवारी 1968 रोजी जन्मलेल्या अभिजात यांनी अहमदाबाद येथील एच. के. आर्ट्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. अभिजात यांनी इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या 'करीब' (1998) या सिनेमाद्वारे त्यांनी सिनेमाच्या पटकथा लेखनाला सुरुवात केली. राजकुमार हिराणी यांच्यासोबत मिळून त्यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' आणि 'थ्री इडियट्स' या ब्लॉकबस्टर सिनेमांची कथा लिहिली आहे. आता ते 'पीके' हा सिनेमा घेऊन येत आहेत.
Q. सिनेमाचे शीर्षक 'पीके' ठेवण्यामागे काही महत्त्वाचे कारण?
A. या शीर्षकात एक वेगळीच गंमत आहे. 'पीके' म्हणजे काय? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. ही कथा एका संपूर्ण कुटुंबाची कथा आहे. 5 वर्षांच्या मुलापासून ते 80 वर्षांच्या व्यक्तींना आवडेल, अशी ही कथा आहे. प्रत्येक सिनेमातून आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये गांधीगिरी, 'थ्री इडियट्स'मध्ये प्रयत्न करा यश हमखास मिळेल, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. या सिनेमाची आत्मा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणारी जिज्ञासा आहे. शीर्षक कायमचे स्मरणात राहिल आणि उत्सुकतासुद्धा निर्माण करेल, याकडे आम्ही लक्ष दिले.
पुढे वाचा, अभिजात जोशी यांनी आणखी काय सांगितले...