आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day: अज्ञातवासात जगतोय पहिला \'इंडियन आयडल\', लोकांनी केली होती भररस्त्यात मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गायक अभिनजीत सावंत)
मुंबई: 2004मध्ये 'इंडियन ऑयडल'चा पहिला विजेता गायक अभिजीत सावंत आज एकप्रकारे अज्ञातवासात आयुष्य जगत आहे. 'इंडियन आयडल' या टीव्ही शोमधून रात्रीतून प्रसिध्द मिळवलेला अभिजीत सावंत आजसुध्दा आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे. आज अभिजीत सावंतचा बर्थडे आहे.
अभिजीतचा जन्म मुंबईमध्ये झाला. 2004 मध्ये त्याने 'इंडियन आयडल'साठी मुंबईमध्ये ऑडिशन दिले होते. त्यामध्ये त्याची निवड झाली. आपल्या सुमधूर आवाजाच्या बळावर अभिजीतचा प्रवास 'इंडियन आयडल'मध्ये त्याने वेस्ट बंगालच्या अमित सानाला हरवून फायनलचा किताब नावी केला. हा किताब नावी करताच अभिजीत सावंत स्टार बनला. परंतु त्याचे स्टारडम जास्त दिवस टिकले नाही.
विजयी होताच काढला पहिला अल्बम
'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर 7 एप्रिल 2005 रोजी अभिजीत सावंतचा पहिला सोलो अल्बम 'आप का अभिजीत' सोनीने काढला होता. या अल्बमने त्याला विशेष ओळख दिली नाही. परंतु 'मुहब्बते लुटाऊंगा'च्या गाण्याने त्याला पुन्हा चर्चेत आणले. त्यानंतर अभिजीतचा दुसरा अल्बम 'जुनून-अभिजीत सावंत' या नावने आले. या अल्बमचा टायटल ट्रॅक 'जुनून' मोठा हिट सिध्द झाला.
'नच बलिए'मध्ये झाला होता सहभागी
अभिजीत आणि त्याची पत्नी शिल्पा डान्स शो 'नच बलिए' (पर्व 4)मध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये ही जोडी परिक्षकांची आवडती जोडी होती. परंतु पब्लिकने या जोडीला नाकारले. त्यानंतर अभिजीतने एक सुपरफ्लॉप 'लॉटरी' सिनेमातून अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. परंतु त्याच्या पदरी अपयश आले.
रस्त्यावर लोकांनी केली होती मारहाण
नोव्हेंबर 2010मध्ये अभिजीत सावंतला मुंबईच्या रस्त्यावर मित्रांसोबत धमाल-मस्ती करणे महागात पडले होते. त्याची मैत्रीण आणि गायिका प्राजक्ता शुक्रेने आपल्या कारने एका स्कुटरला धडक मारली होती. त्यानंतर लोकांनी कारमध्ये बसलेल्या अभिजीतला मारहाण केली होती. धडक मारल्यानंतर उपस्थित लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिजीत त्यांच्याशी बाद घालायला लागला होता. त्यामुळे रागात असलेल्या लोकांनी अभिजीतला मारहाण केली.
युवा सेनेसाठी करतो काम
आज अभिजीत छोटे-मोठे स्टेज शोशिवाय शिवसेनाच्या युवा सेनेसाठी काम करत आहे. अभिजीत युवा सेनेसाठी शोच्या माध्यमातून फंड जमा करणे आणि युवा सेनेचा प्रचार करण्याचे कामदेखील करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभिजीत सावंतची निवडक छायाचित्रे...