आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मितीचा अभिनय रुपेरी पडद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्वप्निल जोशी, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर, सुबोध भावे यांसारखे चॉकलेटी चेह-याचे नायक सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यात आता आणखी एका नव्या नायकाची भर पडली आहे. रंगमंचापासून छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या बहारदार अभिनयाने रसिकांना पोट धरुन हसवणा-या अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. केदार शिंदे दिग्दर्शित 'श्रीमंत दामोदरपंत' या सिनेमाद्वारे अभिनय मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.