मुंबई: करवा चौथचा उपवास
अमिताभ बच्चन दरवर्षी करतात. परंतु यावर्षी त्यांना हा उपवास केला नाही. अमिताभ यांनी त्यामागे उपचाराचे कारण सांगितले आहे. करवा चौथच्या निमित्त सर्व बच्चन कुटुंबीयांसह मुलगी श्वतासुध्दा जलसामध्ये पोहोचली होती.
करवा चौथच्या रात्री सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन चंद्राची वाट पाहिली. जया बच्चन,
ऐश्वर्या राय बच्चन आणि श्वेता नंदा यांनी करवा चौथचा उपवास केला होता. रात्री चंद्र पाहिल्यानंतर सर्वांनी जलसाच्या छतावर जाऊन चंद्राचा चेहरा पाहिला.
विशेष म्हणजे, यावेळी टीना अंबानी आणि अनिल अंबानीसुध्दा जलसामध्ये उपस्थित होते. टीना अंबानीनेसुध्दा जलसामध्ये
आपला उपवास सोडला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करवा चौथच्या निमित्त बच्चन कुटुंबीयांचा छायाचित्रे...