आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abhishek Bachchan Birthday Special : Childhood Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Childhood Photos: कुटुंबासोबत असे गेले अभिषेक बच्चनचे बालपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिषेक बच्चन आणि श्वेतासोबत फुटबॉल खेळताना अमिताभ बच्चन)

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आज वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत अभिषेकचा जन्म झाला. तो दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांचा नातू आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन त्याच्या आई आहेत. अभिषेकच्या थोरल्या बहिणीचे नाव श्वेता बच्चन नंदा आहे.
2007 मध्ये माजी जगतसुंदरी ऐश्वर्या रायसोबत अभिषेकचे लग्न झाले आणि आता तो एका मुलीचा (आराध्या) वडील आहे. अभिषेक नेहमी आराध्यासोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसणारा अभिषेक स्वतः बालपणी खूप खोडकर होता. इंटरनेटवर अभिषेकची बालपणीची अनेक छायाचित्रे उपलब्ध आहेत. या छायाचित्रांमध्ये अभिषेकचा मस्तीखोर अंदाज बघायला मिळतो.
अमिताभ यांनी एकदा खुलासा केला होता, की अभिषेक वयाच्या दुस-या वर्षापासूनच फनी डान्स करायला लागला होता. त्याचा तो फनी डान्स बघून त्यांना 'डॉन' सिनेमातील 'खईके पान बनारसवाला' या गाण्यावर परफॉर्म करण्याची प्रेरणा मिळाली होती.
divyamarathi.com आज तुम्हाला अभिषेक बच्चनची बालपणीची खास छायाचित्रे दाखवत आहे. यापैकी काही छायाचित्रांमध्ये अभिषेक आपल्या कुटुंबीयांसोबत एन्जॉय करताना आणि इतर काही छायाचित्रांमध्ये कॅमे-यासमोर पोज देताना दिसतोय.