लग्नानंतर
ऐश्वर्या राय बच्चनच्या पुनरागमनाच्या योजनेमध्ये सतत अभिषेक बच्चनचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. जे. पी. दत्ता, आर. बाल्की, मणिरत्नम अन्य काही दिग्दर्शकांच्या प्रोजेक्टमध्ये दोघे सोबत दिसणार असल्याची चर्चा होती. ऐश्वर्यानेदेखील
आपण एकतर नायिकाप्रधान चित्रपटास प्राधान्य देऊ किंवा अभिषेकचा समावेश असणारे रोमँटिक चित्रपट करू, असे सांगितले होते. अभिषेकने मात्र ऐश्वर्याच्या या मताचे खंडण करत सध्यातरी दोघांचा एकत्र चित्रपट करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.