आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Bachchan\'s Team In The Final Of Pro Kabaddi League

PICS: पिंक पँथर्सच्या यशाने आनंदीत झालेल्या अभिषेकने बिपाशाला दिले अलिंगन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात टीमला चिअरअप करताना अभिषेक बच्चन, दुस-या छायाचित्रात बिपाशाला अलिंगन देताना अभिषेक)
मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चनची पिंक पँथर्स ही टीम प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. सेमीफायनलमध्ये अभिषेकच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी बजावत फायनलमध्ये धडक मारली आहे. पिंक पँथर्सने पटना पाइरेट्सच्या टीमला 37-18च्या अंतराने मात दिली. आता फायनलमध्ये यू मुम्बा या मुंबई टीमसोबत पिंक पँथर्सचा सामना होणार आहे.
सेमीफायनलमध्ये अभिषेकच्या टीमला चिअरअप करण्यासाठी अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री बिपाशा बसू पोहोचले होते.
टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अभिषेक खूप आनंदी दिसला. मॅच संपल्यानंतर अभिषेकने आपल्या टीमच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर सर्व खेळाडूंनी अभिषेकला उचलून घेत आनंद साजरा केला. विजयानंतर अभिषेकने बिपाशाला अलिंगन दिले.
यू मुम्बा ही रॉनी स्क्रूवालाची टीम आहे. रॉनी बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी होणा-या अंतिम सामन्यात बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींची हजेरी राहणार असल्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जयपूर पिंक पँथर्सची मॅच आणि विजयाची छायाचित्रे...