मुंबई- 14व्या माराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (Marrakech international film festival)मध्ये 'हॅपी न्यू इअर'चे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली. स्क्रिनिंगदरम्यान हजारो लोक उपस्थित होते. यावेळी अभिषेक बच्चन, बोमन इराणी आणि फिल्मची दिग्दर्शिका फराह खानसुध्दा दिसली आहे.
सिनेमात मुख्य भूमिका साकारणार अभिनेता
शाहरुख खान MIFF फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला नाही, मात्र त्याने एक व्हिडिओ मॅसेज चाहत्यांसाठी पाठवला होता. हा व्हिडिओ मॅसेज स्क्रिंनिंगपूर्वी दाखवण्यात आला. स्क्रिनिंगपूर्वी बोमन इराणी, अभिषेक बच्चन आणि फराहने हजारो चाहत्यांसोबत ग्रुफ सेल्फी घेतली. तिघांनी नागिन डान्सदेखील केला. 'हॅपू न्यू इअर'ने भारतात 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
'हॅपी न्यू इअर'मध्ये दीपिका पदुकोण, सोनू सुद आणि विवान शाह यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमाची निर्मिती गौरी खान होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...