आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek, Aishwarya, Jaya Wish Big B On 72nd B’Day

अभिषेकने शेअर केली selfie, 'Birthday boy' अमिताभ यांना दिल्या शुभेच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडूनः जया बच्चन, श्वेता नंदा, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन)
मुंबईः अमिताभ बच्चन यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. जगभरातील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही चाहते त्यांना पत्र, पुष्पगुच्छ पाठवून तर काही सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. अभिषेक बच्चननेसुद्धा काही छायाचित्रे शेअर करुन सोशल मीडियावरुन आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिषेकने ट्विटरवर जी छायाचित्रे शेअर केली आहेत, त्यापैकी एक सेल्फी आणि एक फॅमिली पोज आहे. या दोन्ही छायाचित्रांमध्ये अमिताभ बच्चन, पत्नी जया, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि मुलगी श्वेता नंदा दिसत आहेत. ही सेल्फी अभिषेकने क्लिक केली आहे. या छायाचित्रासह ज्युनिअर बीने ट्विट केले, “Happy Birthday!! #BigB.” तर दुस-या छायाचित्रासोबत अभिषेकने ट्विट केले, “The Birthday boy. #happybirthdayBigB.”
अभिषेकने बिग बींच्या चाहत्यांनी पाठवलेल्या केकचे छायाचित्रसुद्धा आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिषेकने पोस्ट केलेली छायाचित्रे...