(प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीदरम्यान क्लिक झालेली छायाचित्रे)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता
अभिषेक बच्चनच्या ‘जयपूर पिंक पॅंथर्स’ने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद
आपल्या नावी केले आहे. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत पिंक पँथर्सने यू मुंबा टीमला 35-24 असे नमविले. ही अंतिम लढत बघण्यासाठी मुंबईकरांसोबत हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकार पोहोचले होते.
यावेळी आपल्या नव-याच्यान टीमला चिअरअप करण्यासाठी
ऐश्वर्या राय बच्चनने विशेष उपस्थिती लावली होती. जयपूरने विजेतेपद मिळवताच संघाचा मालक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांनी एकच जल्लोष केला. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणा-या जयपूर टीमला एक कोटींचे बक्षिस मिळाले. यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेकचे रोमँटिक क्षण कॅमे-यात कैद झाले.
अंतिम लढत बघण्यासाठी नीता अंबानी, दीपिका सिंह, करण पटेल, संजीव कुमार यांच्यासह बरेच सेलेब्स स्टेडिअमवर पोहोचले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला प्रो कबड्डी लीगच्या अंतिम सामन्यादरम्यान क्लिक झालेली अभिषेक-ऐश्वर्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत... सोबतच पाहा अंतिम लढत बघण्यासाठी पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...