मुंबईः किंग खान शाहरुखने अलीकडेच सोशल नेटवर्किंग साइट ट्विटवर धाकटा मुलगा अबरामचे छायाचित्र शेअर केले होते. पहिल्यांदाच अबरामचे दर्शन शाहरुखच्या चाहत्यांना घडले. आता बातमी आहे, की अबराम लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. होय, शाहरुखची पत्नी गौरी खानने स्वतः ही बातमी दिली आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गौरीने हा खुलासा केला.
मुलाखतीत गौरी म्हणाली, ''हा खूप साधा निर्णय होता. मी शूटला जात असताना फराह आणि शाहरुखने अबरामला सोबत आणायला सांगितले आणि मी असेच केले.'' विशेष म्हणजे केवळ अबरामच नव्हे, तर गौरी खानचे दर्शनसुद्धा 'हॅपी न्यू इयर'मध्ये घडणार आहे. यापूर्वी गौरी 'ओम शांति ओम' या सिनेमाच्या रेड कार्पेटवर दिसली होती.
अबरामचे छायाचित्र
ट्विटरवर पोस्ट करण्यासंबंधित एक खुलासासुद्धा गौरीने यावेळी केला. गौरी म्हणाली, अबराम आता थोडा मोठा झाला आहे. त्यामुळे आता आम्ही त्याला घराबाहेर न्यायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे साहजिकच त्याची छायाचित्रे सर्वत्र येतील. मात्र अबरामचे पहिले छायाचित्र सर्वप्रथम शाहरुखला रिलीज करु इच्छित होता. त्यामुळे शाहरुखने अबराम आणि त्याचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले.