आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abu Sandeep Will Be Dressing Up Arpita Khan For Her Wedding

या डिझायनर्सनी डिझाइन केला आहे सलमानच्या बहिणीचा लग्नाचा बस्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अबू जानी आणि संदीप खोसला (उजवीकडे), अर्पिता खान)
मुंबईः सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता हिच्या लग्नाला आता केवल आठवडा शिल्लक आहे. 18 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिताचा शाही लग्नसोहळा रंगणार आहे. या शाही लग्नात अर्पिता कोणत्या डिझायनरचे कपडे परिधान करणार याची चर्चा रंगत आहे.
खरं तर सोहेल खानची पत्नी आणि प्रसिद्ध डिझायनर सीमा खान अर्पिताचा वेडिंग ड्रेस डिझाइन करणार अशी चर्चा होती. मात्र जेव्हा सीमा खानला याविषयी विचारले असता, तिने सांगितले की ती मलायका अरोरा खान आणि अमृता अरोरा यांचे ड्रेस डिझाइन करत आहे. मग अर्पिताचा वेडिंग ड्रेस कोण डिझाइन करत आहे, याची उत्सुकता निर्माण झाली ना? चला याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो.
अबू-संदीप डिझाइन करत आहेत अर्पिताचा वेडिंग गाउन
सीमा खानने स्पष्ट केले, की प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांना अर्पिताचा वेडिंग ड्रेस डिझाइन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे दोघेही बच्चन आणि अंबानी कुटुंबियांचे आवडते डिझायर्स आहेत. आता अबू-संदीप यांनी डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये अर्पिता कशी दिसणार हे पाहुयात.
हे झालं अर्पिताविषयी. खान कुटुंबातील इतर सदस्यांनीसुद्धा आपापल्या आवडत्या डिझायनर्सकडे त्यांचे आउटफिट्स डिझाइन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. चला तर मग
जाणून घेऊया सलमानसह खान कुटुंबासाठी कोणकोणते डिझायनर्स ड्रेस डिझाइन करत आहेत...