आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लाइट्स, कॅमेरा, अँक्शन.. प्रशिक्षण ओके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये सध्या एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. येथे कलाकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. प्रत्येक नवीन निर्माता आणि कलावंत या कार्यशाळेत आवर्जून भाग घेत आहेत. त्यांना येथे उत्कृष्ट अभिनयाचे धडे आणि गृहपाठही दिला जातो. यासाठी कलाकार खूप मेहनत घेत आहेत.
वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवोदित कलाकार खूप मेहनत घेत आहेत. आपल्या भूमिकेत पूर्णत्व आणण्यासाठी अनेक कलाकार चित्रीकरणाच्या एक महिन्यापूर्वी कार्यशाळा करत आहेत, तर तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेत आहेत आणि होमवर्कदेखील करत आहेत. सोनम कपूर आणि धनुषदेखील 'रांझणा'साठी वर्कशॉप्स करत आहेत. शाहिद कपूर आपल्या आगामी चित्रपटासाठी लँग्वेज क्लास करत आहे. तसेच 'भाग मिल्खा भाग' चित्रपटासाठी फरहान अख्तरने आणि 'बर्फी'साठी रणबीर कपूरनेसुद्धा प्रशिक्षण घेतले होते. नवोदित अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राने 'इशकजादे'साठी एका महिन्याची कार्यशाळा केली होती.
ट्रेड अँनालिस्ट कोमल नाहटाच्या मते, कला आणि मध्यम बजेटचे चित्रपट निर्मातेच आतापर्यंत वर्कशॉप घेत होते. कारण त्यांना कमी रिटेक्समध्ये परफेक्ट शॉट द्यावा लागतो त्यामुळे रीलची बचत होते. इंडस्ट्रीतील एका जाणकरांच्या मते, कलाकारांना चित्रपट सुरू होण्याआधीच सध्याचे निर्माते वर्कशॉप करण्याचा सल्ला देत आहेत. कलाकारदेखील यात उत्साहाने भाग घेतात आणि खूप मेहनतही करतात.
एका वरिष्ठ चित्रपट निर्मात्याच्या मते, आधीचे काही कलाकार याला आपला अपमान समजत होते, पण आजचे कलाकार याला फायदा समजत आहेत.
दिबाकर बॅनजी म्हणतात, पूर्वी कला चित्रपटासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जायच्या, पण आता कर्मशियल चित्रपट निर्मातेदेखील वर्कशॉप करत आहेत. सुभाष घई म्हणतात, आज स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक कलाकार स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी चांगले काम करत आहे. त्यांच्या कामात आणखीन परफेक्शन यावे म्हणून ही कार्यशाळा आवश्यक आहे.
खरंच सोनम भोळीभाबडी मुलगी आहे ?
सोनम कपूर विरुद्ध कॅटरिना कैफ
आयटम नंबर शक्य नाही : सोनम कपूर