आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Aamir Khan Writes To EC, Clarifies He Is Not Supporting AAP

आमिरचे निवडणूक आयोगाला पत्र, \'आप\'गिरी करत नसल्याचे केले स्पष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने अलीकडेच निवडणूक आयोगाला पत्र लिहून, आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसल्याचे म्हटले आहे. तसेच, आम आदमी पक्षाच्याही बाजूने नसल्याचे त्याने पत्रात स्पष्ट केले आहे.
आमिर खान आप पक्षाच्या बाजूने असणारे पोस्ट सध्या सोशल मिडियावर दिसून येत आहे. काही आप कार्यकर्ते निवडणूक प्रचारासाठी आमिरच्या छायाचित्रांचा वापर करत आहेत. 49 वर्षीय अभिनेता आणि 'धूम 3'चा अभिनेता आमिर आपल्या पक्षाला पाठिंबा देत असल्याचे या कार्यकर्त्यांनी ट्विटवर पोस्ट केले आहे.
हे बघता, आमिरने निवडणूक आयोगाला पत्र लिहून, आपण कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नसल्याचे स्पष्ट केले.
याविषयी आमिरच्या प्रवक्याने म्हटले, 'पहिल्या दिवसापासूनच आमिरने आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. तो कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही किंवा भविष्यात त्यांचा प्रचारही करणार नाही.'