आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saugandh To Baby: Bollywood Actor Akshay Kumar Different Looks

'सौगंध' ते 'बेबी'पर्यंत: 24 वर्षांच्या प्रवासात असा बदलत गेला अक्षयचा LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः विविध सिनेमांतील अक्षय कुमारचे लूक)
मुंबईः अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'बेबी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनी सिनेमाला पसंतीची पावती दिली आहे. अर्थातच 'बेबी' या सिनेमाद्वारे अक्षयची नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली, असे म्हणायला हरकत नाही.
या सिनेमात अक्षय कुमारने साकारलेल्या पात्राचे नाव अजय सिंह राजपूत असे आहे. 26/11च्या टेरर अटॅक नंतर दहशतवादाशी लढण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली जाते. या टीमला लीड करतो अक्षय कुमार अर्थातच अजय सिंह राजपूत हा अधिकारी... अतिरेक्यांशी लढण्यासाठी ही टीम सतत कार्यरत असते. सिल्व्हर स्क्रिनवर नेहमी प्रेक्षकांना हसवणा-या अक्कीने अजय सिंह राजपूतची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे.
तसे पाहता अक्षय आपल्या सिनेमातील भूमिकेसोबतच लूकमुळेही चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या लूकमध्ये तो मोठ्या पडद्यावर अवतरला आहे.
सौंगधपासून ते बेबी पर्यंत.. अनेकदा बदलला अक्षयचा लूक
अक्षयने 1991 मध्ये 'सौगंध' या सिनेमाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. त्यावेळी सडपातळ असलेल्या अक्षयचे केस बरेच मोठे होते. त्याकाळात लांब केसांची फॅशन होती. मात्र जसजसे अक्षयचे करिअर पुढे सरकले, तसतसा त्याच्या लूकमध्ये बदल घडत गेला. 24 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांत अक्षय कधी लहान तर कधी लांब केसांत दिसला. इतकेच नाही तर कधी पोनी, कधी जीरो मशीन, कधी पगडी, तर कधी मिशीत अक्षय दिसला.
अक्षयच्या सिनेमांतील असेच काही निवडक लूक आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत. पुढील स्लाईड्मध्ये पाहा अक्षयचे विविध लूक...