आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Anuksh Choudhary's Wrist Fractures During Fight Sequence

अंकुश चौधरीचा चित्रीकरणादरम्यान हात फ्रॅक्चर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान होणारे अपघात चित्रपटसृष्टीला तसे नवीन नाहीत. पण या अपघातांमुळे कधी कधी चित्रपटाचे चित्रीकरण लांबते तरी वा कलाकारांच्या अपघातानंतरही काम करण्याच्या जिद्दीचे कौतुक होऊन चित्रपटाला त्यातूनही प्रसिद्धी मिळते. अभिनेता अंकुश चौधरीलाही एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अपघाताचा अनुभव नुकताच आला. मात्र त्यानेदेखील जिद्दीने चित्रीकरण पूर्ण करण्याचा हट्ट पूर्ण केला.
‘नारबाची वाडी’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करुन वडिलांचा वारसा जपत दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण करणाºया आदित्य सरपोतदार यांच्या ‘क्लासमेट्स’ या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. यामध्ये अंकुश आणि सई ताम्हणकर यांची भूमिका आहे. सई, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार यांच्यासोबत एक अ‍ॅक्शन सिक्वेन्स करीत होता. मात्र तो करताना त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. दवाखान्यात तातडीने नेले असता मनगटाच्या जागी फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. मात्र यामुळे चित्रीकरण न थांबवण्याचा आग्रह धरीत अंकुशने चित्रीकरण पूर्ण केले. संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपटातील भूमिका गाजवणा-या अंकुशची आदित्यच्या ‘क्लासमेट्स’मध्ये प्रमुख भूमिका आहे. तो लवकर बरा व्हावा व चित्रपटाला यश मिळावे अशी प्रार्थनाच चित्रपटाची टीम करीत आहे.