आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: लव्ह मॅरेज केल्यामुळे अतुल कुलकर्णींच्या घरच्यांना बसला होता आश्चर्याचा धक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अतुल कुलकर्णी पत्नी गीतांजली कुलकर्णीसह)

अतुल कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. एक विचारवंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अतुल कुलकर्णी आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आणि करिअरविषयी सांगत आहोत...
खासगी आयुष्य...
10 सप्टेंबर 1965 रोजी बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुल यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यांचे आईवडिल सोलापूरला स्थिरस्थावर झाले. बारावी पर्यंत बेळगावमध्ये पूर्ण करून तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. मात्र आभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी. महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.
शालेय जीवनापासूनच अभिनयात रुची...
शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमातील नाटकात काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी सोलापुरातील 'नाट्य आराधाना' नावाच्या हौशी नाट्यसंस्थेचे सदस्यही बनले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर त्यांना नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातच कारकिर्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1992 मध्ये अतुल यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. 1995 साली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली
गीतांजलीसह केला प्रेमविवाह...
अतुल कुलकर्णी यांनी गीतांजलीसह प्रेमविवाह केला. एनएसडीमध्ये त्यांची भेट गीतांजलीसोबत झाली होती. अवधूत गुप्तेंच्या 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये अतुल कुलकर्णी यांनी आपल्या प्रेमविवाहाविषयी सांगितले होते.
अतुल यांनी सांगितले होते, ''मी प्रेमात पडलो किंवा प्रेमात कसा अडकलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे. मी प्रेमात पडलो आणि विवाहबद्ध झालो, हा माझ्या घरच्यांसाठीसुद्धा आश्चर्याचा धक्का होता. कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर कलाकार म्हणून बदलत गेलो. सोलापुरात एक नाटक केले. त्या नाटकाने मला रंगभूमीच्या प्रेमात पाडले. त्यानंतर एनएसडी गेलो. एनएसडीत गीतांजलीबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले.''
तर गीतांजली यांनी म्हटले होते, ''परफेक्शनिस्ट अतुलची पत्नी असण्यापेक्षा मी त्याची शिष्य किंवा फॉलोअर अधिक बनलेय''
दोनदा राष्ट्रीय पुरस्कारावर उमटवली मोहोर...
अतुल कुलकर्णी यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. 'हे राम' या सिनेमातील श्रीराम अभ्यंकर या भूमिकेसाठी त्यांना 2000 मध्ये पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2002 मध्ये 'चांदनी बार' या सिनेमातील भूमिकेसाठीही त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले.
हॉलिवूडमध्ये केली एन्ट्री..
आगामी 'सिंग्युलॅरिटी' या सिनेमाद्वारे अतुल कुलकर्णी यांनी हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. या सिनेमात बिपाशा बसू त्यांच्यासोबत झळकणार आहे. तेलगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ सिनेमांमध्येही ते बिझी आहेत.
गाजलेले मराठी सिनेमे
कैरी - 2000
ध्यासपर्व - 2001
10वी फ - 2003
वास्तुपुरुष - 2003
देवराई - 2004
चकवा - 2005
मातीमाय - 2006
वळू - 2008
नटरंग - 2010
प्रेमाची गोष्ट - 2013
हॅपी जर्नी (आगामी)
गाजलेले हिंदी सिनेमे
हे राम - 2000
चांदनी बार - 2001
रन - 2002
दम - 2002
सत्ता - 2003
88 अॅन्टॉप हिल - 2003
खाकी - 2004
पेज 3 - 2005
रंग दे बसंती - 2006
गौरी: द अनबॉर्न - 2007
देल्ही 6 - 2009

नाटके
समुद्र
गांधी विरूद्ध गांधी
माणूस नावचे बेट
आपण सारेच घोडेगावकर
चाफा
झाले मोकळे आभाळ
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अतुल यांची पत्नी गीतांजलीसोबतची खास छायाचित्रे...