आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलिवूड इंडस्ट्रीचे हे स्टार्स अडकले लग्नगाठीत, पाहा Wedding PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता फहाद फाजिल आणि अभिनेत्री नजरिया नाजिम)
मुंबई- मॉलिवूड (मल्याळम फिल्म इंडस्ट्री) अभिनेता फहाद फाजिल आणि अभिनेत्री नजरिया नाजिम अलीकडेच लग्नगाठीत अडकले. पारंपरिक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा तिरुअनंतपूरमध्ये 21 ऑगस्ट रोजी पार पडला. त्यांच्या निकाहनंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीत जवळजवळ तीन हजार पाहुणे सहभागी झाले होते.
गोल्डन कलरच्या लहेंग्यात नजरिया नाजिम खूप सुंदर दिसली. या लहेंग्यासह तिने भरजरी दागिने घातले होते. तर दुसरीकडे फहाद फॉर्मल पँड, शर्टसह नेहरुकट जॅकेटमध्ये दिसला.
या दोघांनी 24 ऑगस्ट रोजीसुद्धा लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. फहाद दाक्षिणात्य दिग्दर्शक-निर्माते फाजिल यांचा मुलगा आहे. फहाद आणि नजरिया गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या कुटुंबीयांच्या समंतीने त्यांचा लग्नसोहळा रंगला. लवकरच हे दोघे 'एल फॉर लव्ह' या सिनेमामध्ये झळकणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लग्नाची निवडक छायाचित्रे...