आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे पाय धुऊन पाणी प्यायचा गोविंदा, पाहा खासगी आयुष्यातील Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- आई आणि भावासोहत गोविंदा)
बॉलिवूड अभिनेता गोविंदाने 'किल दिल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. सिनेमातील त्याच्या कामाची बरीच प्रशंसा ऐकायला मिळत आहे.
शिवाय लवकरच त्याचा दुसरा 'हॅपी एंडिंग' सिनेमादेखील रिलीज होत आहे. दिर्घकाळानंतर गोविंदा रुपेरी पडद्यावर झळकत आहे. गोविंदाचे पुनरागमन यशस्वी ठरते का हे त्याच्या दोन्ही सिनेमांच्या यशानंतर कळेल.
एकेकाळी चीची अर्थातच गोविंदा डान्स आणि कॉमेडीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत होते. गोविंदा ज्या काळात बॉलिवूडमध्ये आला तो काळ रोमान्स आणि अॅक्शन सीनचा होता. त्यावेळी कॉमेडी करण्यात कोणताच अभिनेती कुशल नव्हता. अशात गोविंदाने हे आव्हान स्वीकारले आणि प्रेक्षकांना हळू-हळू आकर्षित केले. त्याच्या कॉमेडी आणि डान्सने लोकांना जणू भूरळच पडली होती. त्याचे 'हीरो नंबर वन', ‘कुली नंबर 1’ 'राजा बाबू', 'आँखे', 'आंटी नंबर वन','पार्टनर'सारखे सिनेमे आजही लोक आवडीने पाहतात.
6 बहीण-भावांमध्ये सर्वात लहान आहे गोविंदा
गोविंदाला 5 भाऊ-बहीण आहेत. तो त्याच्यात सर्वांत आहे. सांगितले जाते, की तो लहान असल्याने तो आपल्या आईच्या खूप जवळ आहे. तो रोज आपल्या आईचे गंगाजलने पाय धुवून पाणी पित होता. आईच्या निधनानंतरसुध्दा त्याने आपली श्रध्दा तशीच ठेवली. गोविंदा आईचे पाय धुवून ते पाणी साचवून ठेवत आणि घरातून बाहेर जाण्याआधी ते पित.
कदाचित आईच्या याच आशिर्वादाने गोविंदा इतका प्रसिध्द झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमा कलाकार आणि कुटुंबासोतची छायाचित्रे...