आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Jitendra News In Marathi, Phalke Ratna, Divya Marathi, Dadasaheb Phalke Academy

अभिनेते जितेंद्र यांना ‘फाळकेरत्न’ पुरस्काराने गौरवण्‍यात आले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दादासाहेब फाळके अ‍ॅकॅडमीच्या वतीने विलेपार्ले येथील भाईदास सभागृह येथे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी जितेंद्र यांना दादासाहेब फाळके रत्न पुरस्काराने महाराष्‍ट्राचे राज्यपाल के. शंकर नारायण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. पुरस्कारास उत्तर देताना जितेंद्र यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
‘पन्नास वर्षांचा माझा अभिनयाचा प्रवास पाहून आज वाटतं की, मी इथे उभा आहे तो सिनेमामुळेच. ज्या सिनेमासृष्टीत मी काम केलं तेथल्या टीमनं मला आज इथवर आणलं आहे. मेरी खामियॉँ छुपाकर, मेरे हुनरको बडा करनेवाले सभी लोगोंकी वजहसें मैं आज ये सम्मान पा रहा हूँ नहीं तो आज मैं रवी कपूरसें जितेंद्र नहीं बन पाता,’ असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांनी काढले.
या समारंभास अभिनेत्री जुही चावला यांना दादासाहेब फाळके पॉप्युलर पुरस्कार देण्यात आला. जुही यांनी या वेळी ‘गुलाब गॅँग’मधील नकारात्मक भूमिकेविषयीचा अनुभव विशद करीत चित्रसृष्टीतील आपल्या कारकीर्दीला अनेकांची साथ लाभल्याचे सांगत त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केले. जुहीबरोबर अभिनेता फरहान अख्तर यांस ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील भूमिकेसाठी फाळके पॉप्युलर पुरस्काराने सन्मानित केले.

पुसाळकर दाम्पत्य नाराज
कार्यक्रम ज्यांच्यामुळे आयोजित केला गेला ते दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर आणि मृदुला पुसाळकर यांना कार्यक्रमाप्रसंगी प्रेक्षागृहामध्ये बसवले गेले. त्यांना व्यासपीठावर सन्मानाने बसवणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे पुसाळकर दाम्पत्य नाराज असल्याची चर्चा होती.