आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Ann: 2 मुलींचे वडील असलेल्या प्रकाश राज यांनी 5 वर्षांपूर्वी थाटला दुसरा संसार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - प्रकाश राज आणि त्यांची पत्नी पोनी, राणी मुखर्जी, श्रीदेवी आणि बोनी कपूर)

बॉलिवूड आणि दक्षिणेचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या लग्नाचा आज पाचवा वाढदिवस आहे. 24 ऑगस्ट 2009 मध्ये त्यांनी कोरिओग्राफर पोनी वर्मासह लग्न केले. पोनीसह हे त्यांचे दुसरे लग्न आहे.
पहिली पत्नी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री लथिका कुमारीसह घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी पोनीसह लग्नाचा निर्णय घेतला. 1994 मध्ये प्रकाश यांनी तामिळ अभिनेत्री लथिका कुमारीसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुली आहेत. प्रकाश आणि लथिका यांना एक मुलगासुद्धा होता, परंतु आजारपणामुळे पाच वर्षांचा असताना त्याचा मृत्यू झाला. प्रकाश यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या आणि लथिका यांच्यात मतभेद होते. परंतु मुलांसाठी हे नाते टिकून होते. मात्र 2009 मध्ये प्रकाश आणि लथिका यांचा घटस्फोट झाला. लथिकाला प्रकाश यांच्यापासून विभक्त व्हायचे नव्हते, मात्र प्रकाश यांना या नात्यापासून पूर्णत: दुर व्हायचे होते.
2012मध्ये प्रकाश यांनी आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान गर्लफ्रेंड आणि कोरिओग्राफर पोनी वर्मासोबत लग्न केले. त्यांनी या लग्नाविषयी आधी आपली आई आणि मुलींची सहमती मागितली. लग्नापूर्वी प्रकाश यांनी पोनीला आपल्या पहिल्या पत्नीला भेटवले आणि सर्व कुटुंबीय सदस्यांचीसुध्दा भेट घडवून दिली. प्रकाश घटस्फोटीत असल्यामुळे आणि पोनीपेक्षा वयाने मोठे असल्याने सुरुवातीला तिचे वडील या लग्नासाठी तयार नव्हते. परंतू मुलीच्या प्रेमापोटी त्यांनी या लग्नाला होकार दिला होता. पोनीचे हे पहिलेच लग्न आहे.
लग्नानंतर मुंबईत जंगी रिसेप्शन पार्टीचे आयोजन...
पोनीसह साध्या पद्धतीने लग्न केल्यानंतर मुंबईत एका जंगी रिसेप्शन पार्टीचे आयोजन प्रकाश यांनी केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. श्रीदेवी, बोनी कपूर, तब्बू, सरोज खान, रुपकुमार राठोड, सुरवीन चावला, शमा सिकंदर, श्रीसंथ, राणी मुखर्जी, युविका चौधरी, गोविंदा आणि त्याची मुलगी नर्मदा, आयशा टाकिया, संदीप सोपारकर, रिमा सेन, मंदिरा बेदी, करिश्मा तन्ना, करण मेहरा, रागिनी खन्ना, करिश्मा तन्ना, कृष्णा अभिषेक, बख्तियार आणि तनाज इराणीसह बरेच सेलेब्स या नवदाम्पत्याला शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
आज प्रकाश आणि पोनीच्या पाचव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीची खास छायाचित्रे दाखवत आहोत.