महेश कोठारे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक... चित्रपट क्षेत्रात उठून दिसणारे एक नाव. पण या एका नावात, त्यांच्या कारकीर्दीत, चित्रपटमय झालेलं अख्खं कुटुंब आहे. आईचे वडील, आजोबा, आई आणि वडील. यात कमी होती ती समीक्षकाची. म्हणजेच हक्काच्या क्रिटीकची. पत्नी नीलिमाने ती पूर्ण केली. संघर्षाच्या शिकवणीपासून, यशाच्या जबाबदार्यांपर्यंतचा 'धडाकेबाज' प्रवास सुरू आहे तो तिच्या भक्कम पाठिंब्यामुळेच...
चित्रपट म्हणजे महेश कोठारेंचा आत्मा. त्यामुळे बाळाचे पाय पाळण्यातच दिसले आणि महेश यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. राजा और रंक, छोटे भैया, घर घर की कहानी सारखे हिंदी चित्रपट त्यांनी केले. पुढे त्यांची कहाणी शिक्षणाच्या ट्रॅकवर जोरात धावली. मायक्रोबायोलॉजीमध्ये एमएस्सी केल्यानंतर त्यांनी लॉकडे मोर्चा वळवला, पण अभिनयाची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच 'प्रीत तुझी माझी' हा चित्रपट मिळाला, पण तो चालला नाही. शिक्षण आणि अभिनयातील संघर्ष सुरू असतानाच, नीलिमाची भेट झाली ती 'प्रीत तुझी माझी' चालण्यासाठीच.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, कसे झाले महेश कोठारे यांचे लग्न...