(पत्नी जेनेलियासोबत रितेश देशमुख)
काही दिवसांपूर्वीच पपा झालेला अभिनेता रितेश देशमुख आज
आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये रितेशची गणना होते. रितेशने 2003 मध्ये अभिनेत्री आणि आता पत्नी असलेल्या जेनेलियासोबत 'तुझे मेरी कसम' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. ‘मस्ती’, ’क्या कूल हैं हम’, ’अपना सपना मनी मनी’, ’हे बेबी’, ‘धमाल’, ’हाउसफुल’, ’डबल धमाल’, ’ग्रँड मस्ती’, ‘एक व्हिलन’ हे त्याचे गाजलेले सिनेमे आहेत.
नऊ वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न...
2003मध्ये जेनेलियासोबत रितेशचे सूत जुळले होते. मात्र त्यांनी आपल्या नात्याविषयी कधीही सार्वजनिकरित्या कबुली दिली नव्हती. नऊ वर्षांच्या डेटिंगनंतर 2012 मध्ये हे जोडपं लग्नगाठीत अडकलं. गेल्या महिन्यात म्हणजे 25 नोव्हेंबरला जेनेलियाने गोंडस बाळाला जन्म दिला.
रितेशची कौटुंबिक पार्श्वभूमी...
महाराष्ट्रातील मोठे राजकारणी घराणे असलेल्या देशमुख कुटुंबात रितेशचा जन्म झाले. दिवंगत राजकारणी विलासराव देशमुख यांचा रितेश दुसरा मुलगा आहे. रितेशला दोन सख्खे भाऊ आहेत. त्याच्या थोरल्या भावाचे नाव अमित देशमुख आणि धाकट्या भावाचे नाव धीरज देशमुख आहे. धीरजचे लग्न बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीच्या बहिणीसोबत झाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रितेश देशमुखचे फॅमिली फोटो...