आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : बालपणापासून ते आत्तापर्यंत... बघा संजयचे कुटुंबीयांबरोबरचे खास क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - संजय दत्त आपल्या कुटुंबींयासोबत)
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आज (29 जुलै) आपला 55 वा वाढदिवस आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे यावर्षी त्याला आपला वाढदिवस तुरुंगातच साजरा करावा लागणार आहे.
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये संजयची गणना केली जाते. संजयने 1981 मध्ये 'रॉकी' सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर एकामागून एक हिट सिनेमे त्याने बॉलिवूडला दिले. मात्र 2003 साली रिलीज झालेल्या 'मुन्नाभाई...' या सिनेमामुळे संजयला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या सिनेमात त्याने त्याचे वडील सुनील दत्त यांच्याबरोबर स्क्रिन शेअर केली होती. तसे पाहता यापूर्वी 'क्षत्रिय' या सिनेमातसुद्धा संजय आपल्या वडिलांबरोबर झळकला होता. मात्र त्यांच्यावर एकही सीन एकत्र शूट केला गेला नव्हता.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संजूबाबाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये संजयचे आपल्या कुटुंबीयांबरोबरचे खास क्षण बंदिस्त करण्यात आले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा संजयची खास छायाचित्रे...