आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सुहास भालेकर कालवश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांचे शनिवारी (2 मार्च) फुफ्फुसाच्या अल्पश्या आजाराने निधन झाले. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ते नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करत होते.
सुहास भालेकर यांनी 60 हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला होता. फुटपायरीचा सम्राट, सारांश, चक्रमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

त्यांच्या पश्चात मुलगा नाट्य दिग्दर्शक हेमंत भालेकर, पाच मुली, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.
सुहास भालेकर यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.