आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Celebrity Ganesha: घ्या अभिनेता स्वप्नील जोशीच्या बाप्पाचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता स्वप्नील जोशीने केलेले ट्विट.)

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याच्या घरी दीड दिवस बाप्पा वास्तव्याला असतात. स्वप्नील इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतो. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात तो चांदीच्या गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करतोय.
यंदादेखील स्वप्नीलने चांदीच्या गणेश मुर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने त्याच्या दारात खास सजावट करण्यात आली आहे. याशिवाय सुंदर रांगोळीसुद्धा रेखाटण्यात आली आहे. आपल्या बाप्पाची छायाचित्रे स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली असून आपल्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्वप्नीलच्या बाप्पाचे दर्शन घडवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा ही खास छायाचित्रे..
(फोटो साभार - अभिनेता स्वप्नील जोशीचे ट्विटर अकाउंट)