आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actres Amruta Singh Turn 59 Today, She Was Married With Saif Ali Khan

B'DAY: वयाने 12 वर्षे लहान असलेल्या सैफसोबत थाटले होते अमृताने लग्न, 13 वर्षे टिकला संसार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल छायाचित्रेः अमृता सिंग, सैफ आणि अमृताच्या लग्नातील क्षण)
80-90 दशकात आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिध्द अभिनेत्री अमृता सिंग आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची पहिली पत्नी म्हणूनही अमृताला ओळखले जाते. 9 फेब्रुवारी 1958 रोजी जन्मलेल्या अमृताचे वडील शावदरसिंह आर्मी ऑफिसर होते आणि आई रुखसाना सुल्ताना यांना राजकारणात होत्या.
अमृताचे फिल्मी करिअर...
अमृताने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 'बेताब' या सिनेमामधून केली होती. या सिनेमात सनी देओलसोबत ती झळकली होती. या सिनेमाची बरीच प्रशंसा झाली होती. सोबतच त्यांच्या जोडीलादेखील प्रेक्षकांनी पसंत केले होते. त्यानंतर अमृताने बरीच हिट सिनेमे बॉलिवूड दिले. ज्यामध्ये, 'मर्द', 'साहेब', 'चमेली की शादी', 'नाम' आणि 'खुदगर्ज'सारखे सिनेमे सामील आहेत. 1985मध्ये प्रदर्शित झालेला 'मर्द' सिनेमा अमृताच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला.
मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मर्द' सिनेमात अमृताला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 80च्या दशकात फक्त सनी देओलच नव्हे तर अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि अनिल कपूर यांच्यासोबतही तिची जोडी पसंत केली गेली.
खासगी आयुष्य...
1991मध्ये अमृत सिंगने तिच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न केले होते. लग्नात अमृताने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मूळची शीख असणाऱ्या अमृताने सैफ अली खानशी गुप्तपणे विवाह केला होता. सैफ अली खानपासून तिला सारा आणि इब्राहिम हे दोन मुले आहेत. 13 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2004मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन सैफ आणि अमृता विभक्त झाले. घटस्फोटानंतर सारा आणि इब्राहिमचा सांभाळ अमृता करतेय. अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफने 2012मध्ये अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले. अलीकडेच अमृता '2 स्टेट्स' या सिनेमात झळकली होती.
आज अमृताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला एकेकाळी आनंदाने आयुष्य व्यतित केलेल्या अमृता आणि सैफच्या खासगी आयुष्याची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत..
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा अमृता आणि सैफने एकेकाळी एकत्र घालवलेले क्षण...