आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिर्घकाळानंतर समोर आली 'आशिकी गर्ल' अनु अग्रवाल, जाणून घ्या कुठे दिसली?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1990मध्ये महेश भट्ट यांच्या 'आशिकी' सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात करणारी अनु अग्रवाल दिर्घकाळ या झगझग जगापासून गायब होती. परंतु तिला मुंबईमध्ये एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मन्स आर्ट्स)मध्ये बघण्यात आले आहे. अनु या कार्यक्रमात सामील झाली होती. 1999मध्ये एका अपघाताने तिच्या आयुष्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला. या घटनेमध्ये तिची स्मरणशक्ती गेली होती आणि तिचे काही अवयव अक्षम झाले होते.
अनु 29 दिवस कोमात असल्याने तिला स्वत:चा पूर्णत: विसर पडला आणि ती आपली भाषादेखील विसरली होती. तिला अर्धांगवायूसुध्दा झाला होता. परंतु दिर्घकाळाच्या उपचारानंतर ती या दुखण्यातून बाहेर पडण्यास यशस्वी झाली. मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीने पुन्हा तिने इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकून घेतली. त्या दिवसांमध्ये अनु मुलांना योगा आणि व्यायाम शिकवत होती.
एनसीपीएमध्ये आयोजित या कार्यक्रमात अनु काही अधिका-यांसोबत दिसली. अनुचा चेहरा पहिल्यापेक्षा आता पूर्णत: बदलेला दिसत होता. या कार्यक्रमात तिच्यासोबत काही परदेशी पाहूणेसुध्दा दिसले. तिने आपल्या करिअरमध्ये एका डझनपेक्षाही कमी सिनेमे केले. त्यामधील तिचा 'आशिकी' हा सिनेमा सुपरहिट ठरला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अनु अग्रवालच्या करिअरविषयी अधिक माहिती...