(फाइल फोटो- अभिनेत्री गोहर खान)
नवी दिल्ली- '
बिग बॉस 7'ची विजेती मॉडेल गोहर खानला रविवारी (30 नोव्हेंबर) 'इंडियाज रॉ स्टार' या रिअॅलिटी शोच्या फिनालेदरम्यान एका तरुणाने थोबाडीत मारली. गोहर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होती. तरुणाने स्टेजवर तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. गोहरने त्याला विरोध केल्याने त्याने शो संपल्यानंतर आरोपी स्टेजवर चढला आणि तिला थोबाडीत मारली. हे पाहून उपस्थित सर्व लोक अवाक झाले. तेथील गार्डने ताबडतोबड त्या आरोपी तरुणाला पकडले. त्या तरुणाचे नाव मोहम्मद शफीक आहे.
पोलिसांनी ओरोपीला अटक केली आहे. तरुणाशी चौकशी करताना त्याला विचारल्यास त्याने सांगितले, 'गोहरने छोटे कपडे परिधान केलेले होते म्हणून तिच्या कानशिलात लगावली.' मात्र, पोलिसांचे म्हणणे आहे, की तरुणाने गोहरची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या विरोध केल्याने त्याने तिच्या कानशिलात लगावली. आरोपीला पोलिसांनी अटक केली. उद्या (2 नोव्हेंबर) त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
या घटनेचा व्हिडिओ बघा, पुढील स्लाईडवर....