आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Hema Malini Injured In Jammu Kashmir Rally

गर्दीमधील धक्का-बुक्कीने हेमा मालिनी झाल्या जखमी, तोंड झाकून निघाल्या बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जम्मूमध्ये रॅलीदरम्यान हेमा मालिनी लोकांमध्ये तोंड झाकून बाहेर पडताना)
श्रीनगर- जम्मूच्या रेहरीमध्ये प्रचाराच्या रॅलीदरम्यान भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी जखमी झाल्या. त्यानंतर सर्व प्रचार दौरे रद्द करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार हेमा मालिनी मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणूकीसाठी प्रचार करत आहेत. याच प्रचारासाठी त्या जम्मूच्या रेहरी जिल्ह्यातील सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचल्या होत्या.
हेमा यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी जमली होती. हेमा लोकांमध्ये पोहचताच धक्का-बुक्की सुरु झाली. या धक्का-बुक्कीमुळे हेमा जखमी झाल्या. गर्दीतून स्वत:ला वाचवण्यासाठी त्या तोंड झाकून बाहेर पडल्या. या घटनेनंतर हेमा यांनी इतर दौरे रद्द केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हेमा मालिनी यांच्या रॅलीचे PHOTOS...