आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts : इतिहासमध्ये पदवी प्राप्त करणा-या हुमाने रंगभूमीवरुन केली करिअरची सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - हुमा कुरैशी)

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी आज आपला 28वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 जुलै 1986 रोजी दिल्लीत एका मुस्लिम कुटुंबात तिचा जन्म झाला. यंदा हुमा दुहेरी सेलिब्रेशन करत आहे. कारण ईदच्या मुहूर्तावर तिचा वाढदिवस आला आहे. त्यामुळे वाढदिवस आणि ईद असे दुहेरी सेलिब्रेशन घेऊन हे वर्ष आले आहे. याशिवाय हुमासाठी आणखी एक आनंदाचे कारण म्हणजे, यावर्षी तिचे आईवडील मुंबईत तिच्यासोबत आहेत. त्यामुळे वाढदिवस आणि ईद हुमा त्यांच्यासोबत साजरी करत आहे.
हुमाचे खासगी आयुष्य...
हुमा मुळची दिल्लीची असून ती तेथेच लहानाची मोठी झाली आहे. तिचे वडील सलीम कुरैशी रेस्तरॉ मालिक असून त्यांची 'सलीम्स' (Saleem's) या नावाने रेस्तरॉ चेन आहे. तर तिची आई अमिना कुरैशी या हाऊसवाइफ आहेत. हुमाला तीन भाऊ असून त्यापैकी एकजण बॉलिवूड अभिनेता आहे. हुमाने दिल्लीतील गार्गी कॉलेजमधून इतिहास या विषयात पदवी प्राप्त केली आहे.
मॉडेलिंग आणि रंगभूमीवरुन केली करिअरला सुरुवात..
हुमाने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली. तिने दिल्लीतील अॅक्ट 1 थिएटर ग्रुप नावाचे थिएटर जॉईन करुन काही नाटकांमध्ये अभिनय केला. याशिवाय तिने काही सामाजिक संस्थांसाठी डॉक्युमेंट्री फिल्ममेकर म्हणूनसुद्धा काम केले. त्यानंतर 2008मध्ये मित्रांच्या सांगण्यावरुन तिने मुंबई गाठली आणि येथे 'जंक्शन' या सिनेमासाठी ऑडीशन दिले. या सिनेमासाठी तिची निवडसुद्धा झाली. मात्र काही कारणास्तव हा सिनेमा पूर्ण झाला नाही. त्यानंतर हुमाने एका नामांकित कंपनीसाठी टीव्ही जाहिरातींचा दोन वर्षांचा करार साइन केला. आमिर खानसह सॅमसंग मोबाईल, शाहरुख खानसह नेरोलॅक, विटा मारली, सफोला ऑईल, पिअर्स सोप यांसारख्या जाहिरांतीमध्ये काम केले.
बॉलिवूडमध्ये अशी मिळाली पहिली संधी...
सॅमसंग मोबाईलची जाहिरात करत असताना दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची नजर हुमावर पडली. तिच्या अभिनय आणि लूक्समुळे ते प्रभावित झाले होते. त्यांनी तिला आपल्या गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमात पहिली संधी दिली. गँग्स ऑफ वासेपूरच्या दुस-या भागतसुद्धा हुमा झळकली. या दोन्ही सिनेमांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या आणि अशाप्रकारे हुमासाठी बॉलिवूडचे दार उघडले. त्यानंतर तिचे लव शव ते चिकन खुराना, एक थी डायन, शॉर्ट्स (शॉर्ट फिल्म), दी डे, डेढ इश्किया हे सिनेमे मोठ्या पडद्यावर झळकले. आगामी 'बदलापूर' सिनेमात ती झळकणार आहे.
मराठी सिनेसृष्टीत घेतेय एन्ट्री...
आगामी 'हायवे' या मराठी सिनेमाद्वारे हुमा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण घेतेय. उमेश कुलकर्णी या सिनमाचे दिग्दर्शक आहेत. यासाठी ती मराठीचे धडेसुद्धा गिरवत आहे.
अर्जुन बावेजासह जुळले नाव...
फॅशन, बॉबी जासूस या सिनेमात झळकलेला अभिनेता अर्जुन बावेजासह हुमा रिलेशनशिपमध्ये होती. मात्र अल्पावधीतच या दोघांचे मार्ग विभक्त झालेत.
आज हुमाच्या 28व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिचे 28 ग्लॅमरस छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा हुमाचा ग्लॅमरस आणि दिलखेचक अंदाज...