(PETAच्या नवीन जाहिरातीत बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज)
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिने पेटाच्या एका नवीन जाहिरातीसाठी फोटोशूट केले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोशूटमध्ये ती बॅकलेस दिसत आहे. प्रिंटसाठी शूट करण्यात आलेली ही जाहिरात लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर करण्यात येणार आहे.
या नवीन फोटोशूटविषयी इलियाना म्हणाली, ''सश्यांना क्रूर वागणूक दिली जाते. फरच्या वापरासाठी त्यांच्या जीवंतपणी त्यांची चामडी काढली जाते. हे एखाद्या भयावर धक्क्याप्रमाणे आहे. या शूटच्या माध्यमातून हे थांबवण्याची अपील मी करत आहे.''
पहिल्यांदाच इलियानाने पेटासाठी फोटोशूट केले आहे. यापूर्वी
आलिया भट्ट, लारा दत्ता,
सिद्धार्थ मल्होत्रा, मलायका अरोरा खान, मेरी कोमसह ब-याच सेलिब्रिटींनी पेटासाठी फोटोशूट करुन प्राण्यांचा बचाव करण्याची अपील केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलिब्रिटींनी PETAसाठी केलेल्या फोटोशूटची छायाचित्रे...